भाजपा गटनेते भगत बालाणी व अनिल चौधरी यांच्या गटासह १० जणांवर गुन्हे दाखल.
भाजपा गटनेते भगत बालाणी व अनिल चौधरी यांच्या गटासह १० जणांवर गुन्हे दाखल.
जळगाव प्रतिनिधी-भुसावळ शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या टोळक्याने ढाब्यावर एकाला रिव्हॉल्वर लावून राडा घातला. समोरच्या गटातील मुकेश माळी हा जळगावचे नगरसेवक सुनील माळी यांचे बंधु असून दोन्ही गट समोरा-समोर येवुन रविवारी महिंद्रा ढाब्यावर वाद विकोपाला गेला हेाता. रात्री उशिरा दोन्ही गटाने आपसांत समझोता घडवून आणल्यावर वाद मिटला. पोलिसांना घटना माहिती झाल्यावर मात्र, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत देान्ही गटाविरुद्ध गुन्ह्याची नेांद करण्यात आली आहे.
जळगाव-भुसावळ महामार्गावर हॉटेल महिंद्रा नावाने ढाबा आहे, येथे रविवार (ता.१३) रेाजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नगरसेवक सुनील माळी यांचा भाऊ मुकेश दत्तात्रय माळी त्यांच्या सेाबत ४-५ लोकांना घेवून जेवणासाठी आला होता. थोड्याच वेळात या ठिकाणी अनील छबिलदास चौधरी, भाजपा गटनेते नगरसेवक भगत बालाणी असे तीन चार लोक जेवणासाठी आले. जेवण अटोपल्यावर अनील चौधरी याने एका खुर्चीला लाथ मारुन नंतर तीच खुर्ची उचलून एका कुत्र्याला मारुन फेकली.यावरुन वाद विकोपाला जावुन मुकेश माळी व अनील चौधरी यांच्यात शाब्दीक चकमक उडून शिवीगाळ झाली. वाद वाढल्याने दोन्ही गटातील लोक एकमेकांवर धावुन गेले. त्यापैकी अनील चौधरी सोबतच्या तरुणाने रिव्हॉल्वर काढून समोरच्यांवर रेाखले होते.
घडल्या प्रकाराची राजकिय गोटात चर्चेला उधाण येवून, माहिती पेालिसांपर्यंत पोहचली. निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घडला प्रकार वरीष्ठानाक कळवून चौकशीसाठी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपुत, किशोर पाटिल अशांना चोकशीला पाठवले ढाबा मालकाची चौकशी करुन सीसीटिव्हीचा डिव्हीआर ताब्यात घेत तपासणी केल्यावर संपुर्ण घटनाक्रम चित्रीत झाल्याचे आढळून आल्याने या प्रकरणी पेालिस कर्मचारी मुकेश पाटील याच्या तक्रारीवरुन अनील छबीलदास चौधरी, केदारनाथ वामन सानप, दुर्गेश ठाकूर, अनील चौधरीचा वाहन चालक गोलू (सर्व रा.भुसावळ), भगत रावलमल बालाणी, याच्यासह दुसऱ्या गटातील मुकेश दत्तात्रय माळी, छोटू पाटिल आणि त्यांच्या सोबत आणखी इतर अशा मध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील करीत आहेत.
bjp gatnete bhagat balani sah anil chaudhari yanchya sah10 janavar gunha dakhal

कोणत्याही टिप्पण्या नाहीत