Contact Banner

आ चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गाव दत्तक घेणार-

 


आ चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गाव दत्तक घेणार

मुक्ताईनगर  प्रतिनिधी-मुक्ताईनगर  विधानसभा मतदार संघातील होऊ घातलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील ५१ , बोदवड तालुक्यातील २९ व रावेर तालुक्यातील २१  ग्रामपंचायतींसाठी निवडणुक होऊ घातलेली असून प्रशासन यासाठी जोमाने कामाला लागले आहे .परंतु जे गाव  संपूर्ण बिनविरोध निवडणूक पार पाडतील या गावांना दत्तक घेऊन त्या गावात वेगवेगळ्या निधीतून भरीव विकास कामे करण्यात  येतील तसेच त्या गावातील नागरिकांना पायाभूत व मूलभूत सुविधा परिपूर्ण पणे पुरविल्या जातील अशी घोषणा मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.grampanchayat nivdnuk binvirodh kelyas gavala dattak ghenar amdar chandrakant patil

              कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना आजाराचा प्रसार अधिक होऊ नये, तसेच प्रशासनावर देखील कामकाजाचा ताण पडू नये, व निवडणूक खर्चाची बचत व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमदार पाटील यांनी सदरचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जर गावाचा योग्य विकास करून घ्यायचा असेल तर त्या गावातील नागरीकांनी एकत्रित बसून आलेल्या संधीचे सोने करावे अशी चर्चा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.