वाकडीच्या जवानाला जम्मूत वीरमरण
वाकडीच्या जवानाला जम्मूत वीरमरण
चाळीसगाव प्रतिनिधी-जम्मूतील पुंछ येथे कर्तव्यावर असताना बर्फवृष्टीत जखमी झालेल्या तालुक्यातील वाकडी येथील ३३ वर्षीय जवानाला वीरमरण आले . अमित साहेबराव पाटील असे या शहीद अमित पाटील जवानाचे नाव असून , जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना जम्मू येथील इस्पितळात बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . तालुक्यातील सैन्य दलातील जवान शहीद होण्याचा महिन्याभरातील हा दुसरा आघात असून , त्यांच्या या वीरमरणाची वार्ता कळताच वाकडी गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली . त्यांच्यावर शुक्रवारी शासकीय इतमामात वाकडी येथे अंत्यसंस्कार आहेत . अमित पाटील हे २०१० मध्ये लातूर येथे सीमा सुरक्षा दलात ( बीएसएफ ) भरती झाले होते . आता ते जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत