गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन पकडले
गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन पकडले
यावल प्रतिनिधि:- शहरातून अवैधरित्या व अत्यंत निर्दयपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या एकाला वाहनास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली, असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून गुरे गोशाळेत रवाना करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश मधुकर ढाकणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना एका वाहनास बेकायदेशीरपणे विनापरवाना कत्तलीचा उद्देशाने गोवस जातीचे बैल फैजपुरकडून वाहतुक वाहतूक करताना आढळले.
शहरातील बुरुज चौकात हे वाहन पोलिसांनी थांबवले.या वाहनात गोवंश जातीचे तीन बैल होते.वाहन चालक शेख उमर शेख फारुख रा.सावदा (शेकपूरा) यांच्याकडे गुरे वाहतूकीचा परवाना नव्हता, त्यामुळे चालकासह शेख मोहसीन शेख लूकमान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गुरे निमगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत