बंदी असूनही टिक टॉक ने टाकलं फेसबूक, इंस्टाग्राम ,व्हॉट्सऍप ला मागे
बंदी असूनही टिक टॉक ने टाकलं फेसबूक, इंस्टाग्राम ,व्हॉट्सऍप ला मागे
वृत्त सेवा:- भारतासारख्या काही देशांनी टिक टॉक वर बंदी घातलेली असतानाही तेच जगातल नंबर एप्लीकेशन ठरला आहे. टिक टॉक हे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही व्यासपीठांवर 2020 मध्ये सर्वात जास्त डाउनलोड झालेल्या ठरला आहे.
ॲप ॲनी आणि नावाची एक संस्था या संदर्भातलं विश्लेषण करते त्या संस्थेच्या अहवालानुसार tik.tok ने यंदा फेसबुकला मागे टाकून पहिले स्थान पटकावले असून 2021 मध्ये दरमहा सरासरी 1.2 अब्ज जण टिक टॉक वापरत असतील असा अंदाज आहे. त्यात व्यक्त करण्यात आला आहे. 2020 मध्ये झालेल्या डाऊनलोड्स चा विचार करता फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप यांनी अनुक्रमे तिस-या आणि पाचव स्थान मिळवला आहे. फेसबूक मेसेंजर ॲप 2019 मध्ये सर्वात जास्त डाऊनलोड केलं गेलेलं ठरलं होतं, यंदा मात्र त्याच स्थान सहावा क्रमांकावर फेकला गेला आहे.विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे झूम हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ॲप यंदा चौथ्या स्थानावर असून गेल्यावर्षीच्या तुलनेत या ॲप डाऊनलोडच्या यादीत 219 क्रमांकाने झेप घेतली आहे.
अॅप ॲनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की ॲपल ॲप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोर वरून जगभरात होणाऱ्या वार्षिक डाउनलोड संख्या 130 अब्ज पोहोचणार आहे. गुगल प्ले वरून जगभरात होणाऱ्या डाउनलोड ची संख्या आयओएसवरून होणाऱ्या डाउनलोड च्या तुलनेत 160 टक्क्यांनी जास्त आहे. 2020 चा विचार करता वर्षभरात दोन्ही ॲप स्टोअर वरून होणाऱ्या डाउनलोड च्या संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे जगभरातल्या अनेक नागरिकांनी बराचसा वेळ घरातच आपल्या स्मार्टफोनवरील व्यतीत केला त्यामुळे डाउनलोड ची संख्या अधिक वेगाने वाढली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत