Contact Banner

भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्र बिंदू शिवसेना भवनच असणार

 


भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्र बिंदू शिवसेना भवनच असणार

मुंबई : राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला भलताच जोर आल्याचे दिसत आहे . माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेची साथ सोडत सोमवारी भाजपमध्ये घरवापसी केली . यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात आणखी लोकांचे प्रवेश होणार , असे विधान करत सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या . अशातच आज नाशिक आणि धुळ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला . शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेना भवनात हा पक्षप्रवेश पार पडला . आणखी काही दिवस थांबा भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवनच असणार , असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत त्यांनी केला . पक्षप्रवेशानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला . अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत . तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचे सूचक विधान संजय राऊत यांनी केले . आमचा एकही आमदार फुटणार नाही , असे विरोधक म्हणतात . पण काही दिवस थांबा , काय काय होतेय ते दिसेल , असेही ते म्हणाले . दरम्यान , देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला एकत्र निवडणूक याणाचे आवाहन केले आहे . त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की , पदवीधर - शिक्षक मतदारसंघात त्याची चाचणी झाली आहे . महाराष्ट्राच्या तीनही प्रमुख विभागांमध्ये एक छोटेसे युद्ध आम्ही केले आणि ते एकत्र जिंकले , असा टोला त्यांनी लगावला . बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये गेले त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेचे नुकसान झाले का ? या प्रश्नावर बोलताना ते आले तेव्हा कुठे फायदा झाला होता . नुकसानीचा प्रश्नच नाही , असा पलटवार संजय राऊत यांनी केला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्र संचारबंदी लागू केल्याने विरोधक त्यावर टीका टिप्पणी करत आहेत . यावरही राऊत यांनी विरोधकांचा चांगलाचा समाचार घेतला . भाजपला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे . कारण टीका करण्यात त्यांचा हात कोणीही धरणार नाही . कोणत्याही विषयवार ते टीका करत आहेत . लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे . लोकांना मारायचे आहे का ? ब्रिटनमध्ये काय चालले आहे ते बघा . बरेच महिने पंतप्रधान मोदी हे परदेशात गेले नाहीत . त्यामुळे परदेशात काय चालले आहे , याची माहिती भाजपवाल्यांना नसेल तर ती त्यांनी घ्यावी , असा घणाघात राऊत यांनी केला . आपल्या आरोग्याचे रक्षण व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लावली आहे . सरकार जागरूक आणि सावध असून हा कयूंचा निर्णय घेण्यात आला असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.