केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद -डॉ सुशांत शशिकांत पाटील
केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद -डॉ सुशांत शशिकांत पाटील
केसांच्या निगेसाठी अमुक शाम्पू , कंडिशनर लोक वापरतात पण त्याचा फारसा फरक पडत नाही. केसांच्या तक्रारी दूर होत नाही . केस गळणे , कोंडा होणे, केस लवकर अथवा कमी वयात पांढरे होणे अश्या अनेक तक्रारी लोक करत असतात . केस हे सौंदर्य विषय म्हणून लोक बघतात . काळे आणि घनदाट केस असणे हे व्यक्तीला त्यांचे व्यक्तिमत्व दर्शविण्यात सामाजिक तसेच सौंदर्य भूमिका म्हणून समजले जातात .
कलियुगात लोक केसांचा शृंगार करतील असे वर्णन पुराणात वाचायला मिळते , तसे आज दिसते देखील, स्त्रिया पुरुष वेगळ्या वेगळ्या केश रचना , रंग सुशोभीकरण करताना दिसतात. अगदी लेण्यांमध्येही कोरलेल्या मूर्त्यांमध्ये तसे दिसते . https://www.lewajagat.com/2020/11/thoyroide
केश म्हटले म्हणजे शरीरावरील सर्व केस सारखेच असे लोक समजतात. आयुर्वेदात असलेल्या विचारानुसार शरीरावर असणारे केस सर्व च सारखे नाहीत . पुरुष मंडळींनी दर पंधरा दिवसांनी केस कापावेत असे सांगितले आहे तर स्त्रियांनी केस कापू नये या मुळे शारीरिक बदल तसेच आजार स्त्रियांत होतात असे विचार आयुर्वेदात मांडलेला आहे . केश हे गंधक, कॅल्शियम ,लोह यांनी बनलेला भाग आहे असे सामान्यतः अनेक लोक जाणतात . आधुनिक शास्त्र असे सांगतेही . आयुर्वेद शास्त्रात अस्थी धातू तयार होत असताना नख केश दंत असे तीन भाग तयार होतात, केश हा अस्थी धातू चा मल आहे असे वर्णन मिळते . शरीरातील अस्थी धातू चांगला असेल तर त्याचा माळ केश हा चांगला असू शकतो . केसांकडे केवळ सौंदर्य विषयातून न बघता आरोग्य विषयक दृष्टीने सुद्धा बघावे . आयुर्वेद आणि आरोग्य या बद्दल जाणून घेण्यासाठी नजीक च्या आयुर्वेद तज्ञांना विचारून ही माहिती मिळू शकते .
केसांचे आजार म्हटले तर अनेक आजार समोर येतात . केस केस गळत असताना रोज 10 20 केस गळणे हे सामान्य समजावे. पण त्याच्या पेक्षा जास्त गळत असतील तर ते केस तपासून त्यातील तुटलेले किती , भुरे किती , मुळासकट तुटलेले किती , एकापेक्षा अनेक तोंडे असलेले किती , पांढरे किती ? या नुसार आयुर्वेद तपासणी करून प्रकृती परीक्षणे करून आजार ठरविण्यात येतात. प्रकृती अनुसार केश कसे असावेत असे विचार आयुर्वेदात मांडलेले आहेत . कफ प्रकृती चा व्यक्तीला घन निल केस असतात असे वर्णन आहे , पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला टक्कल लवकर पडते रक्त धातू शी संबंधित आजार उत्पन्न होतात यकृताशी समबंधीत आजार निर्माण होतात त्वचा रोग उत्पन्न होतात . वात प्रकृतीच्या व्यक्तीला कुरळे केस असतात, केस लवकर गळतात टक्कल दने हे पित्त प्रकृतीच्या माणसासारखे गळू शकतात. आपली प्रकृती काय आणि त्यानुसार काय काळजी घ्यावी या संबंधी नजीक चे आयुर्वेद तज्ञ तुम्हाला माहिती देऊ शकतात . अमुक व्यक्तीचे केश असे आहेत आणि माझे असे आहेत असे तरतम भावाने वागणारे लोक केसांना सरळ करणे त्यासाठी त्यांना इस्त्री सारखी क्रिया करणे , वाफ देणे , रंग लावणे ह्या क्रिया तुमचे केस आणि त्वचा दोघेही खराब करू शकतात. तुमचे पोट चांगले आहे , कोठा व्यवस्थित साफ होतोय, व्यवस्थित वेळेवर भूक लागतेय, तुमच्या वयानुसार केस जसे दिसावे तसे दिसत आहेत तर उगाच रंग लावून अथवा क्रिया वापरून त्यांना इतर अमुक व्यक्ती सारखे करण्याचा प्रयत्न करू नये . वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती चे त्या त्या प्रकृती नुसार केस हे वेगळे असू शकतात. स्त्रियांचे केस गळतात आणि त्यांना हे आरोग्य आणि सौंदर्य या दृष्टीने देखील चिंतेचा विषय असू शकतो. आयुर्वेद अनुसार
यात विचार करताना गर्भाशयाचे आरोग्य कसे , रज दर्शन होण्याचे वय काय आहे , मुले बाळे किती आहेत, किती ऑपरेशन झाली आहे , पाळी कशी येते, अंगावर कसे आणि किती जाते पाळी वेळी स्तनात गाठी येतात या अनेक गोष्टी बघाव्या लागतात. केसांचा विचार करताना मल मूत्र रज प्रवृत्ती यांचा विचार करावा लागतो. गर्भ प्रवृत्ती च विचार करावा लागतो . आज काल बऱ्याच स्त्रिया पाळी च्या काळात अनेक गोष्टी पाळत नाही , त्या सर्व गोष्टी रजस्वला परिचर्या म्हणून आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत त्या जाणवून घेऊन त्या पालन करण्याचा प्रयत्न करावा. आयुर्वेद हे केवळ वैद्यक शास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे , त्यात केवळ औषधांचा विचार नसून दिनचर्या ऋतूचर्या यांचा देखील विचार मांडलेला आहे . यांचे पालन करताना केसांचे आरोग्य सुधारताना दिसून येते .
केसांच्या तक्रारी बाळाला होऊ नये म्हणून बीज संस्कार करता येतात . यात आई आणि वडिलांना औषधे देता येतात. यात केश हा अस्थी मल म्हणजे घन असलेल्या धातू चा मल असल्याने त्याचे गुण वडिलांकडून येतात असे आयुर्वेदात विचार आहेत, यासाठी बाळाचे केश चांगले यावेत हे वाटत असताना वडिलांच्या घरात जर केसांचे आजार असतील तर वडिलांना औषधे आधी देऊन नंतर गर्भधारणा विचार करणेसाठी विचार करणे . लहान वयात जर केस पांढरे व्हायला लागले तर विचार करताना कफ दोषाचा लहान वयात विचार करावा लागतो, या विचारात पित्त आणि वात हे दोष या कफाच्या वयात कश्याने वाढतात हे बघावे लागतात. पण ते मूल जर सतत आंबट खारट तिखट सतत खात असेल , आई वडील सोबत सतत बाहेर चे अन्न खायला जात असताना सतत तिखट चमचमीत जेवण जेवण्याची सवय असेल तर असे आजार होताना दिसतात . आज काल ची जीवनशैली पाहता जेवणाचीही व्यसन असू शकते का ? हा विचार मनात येतो. तर केस विचार करत असताना वैद्याने आहार आणि विहार याचा विचार रुग्णात जरुर करावा .
समुद्र स्नान करू नये, मांस सतत खाऊ नये, मासे जास्त खाऊ नये , विषाचे पदार्थ अंगाला लागणे , या मुळे अंगावरील केस जाऊ शकतात. एका केसाला 1 पेक्षा जास्त मुळे असणे , केस भंगणे हे लक्षणे अनेकांना दिसून येतात. यात वात दोषाचा विचार करावा लागतो . यात रोज अभ्यंग करणे, केसांना रोज तेल लावणे यासारखे उपचार वैद्याच्या सल्ल्याने करून घ्यावेत .
डॉ सुशांत शशिकांत पाटील
आयुर्वेदाचार्य :।
विद्यानगर , फैजपूर
9158949110
दर रविवारी
सावदा ता रावेर
10 ते 1
दर
शुक्रवारी
यावल येथे
10 ते 1 , 3 ते 6

कोणत्याही टिप्पण्या नाहीत