Contact Banner

गावठी पिस्तुलांची तस्करी उधळली. ११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्यांसह आठ मॅग्झीन , ३२ काडतुसे जप्त

 

मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तुलांची तस्करी उधळली.

११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्यांसह  आठ मॅग्झीन , ३२ काडतुसे जप्त

नाशिक  प्रतिनिधी-आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्त्रास्त्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले होते . लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तुलासह पाच काडतुसे जप्त केली . त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी छडा लावत तब्बल ११ संशयित आरोपींना गावठी कट्ट्यांच्या खरेदी - विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ६ गावठी पिस्तूल ८ मॅझिनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत . मालेगाव , चांदवड , येवला , लासलगाव या तालुक्यांमधील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी तपासचक्रे फिरविली . मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे लासलगावातून संशयित विपुल यमाजी आहिरे यास एरिगेशन कॉलनीमध्ये छापा टाकून अटक केली . त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांनी गावठी पिस्तूल व पाच काडतुसे मिळून आली . त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गावठी पिस्तूल देणारा मध्य प्रदेशमधील म्होरक्या तसेच अन्य खरेदीदारांची माहिती पोलिसांकडे उघड केली . यावरून तांबे यांनी त्वरित सहायक निरिक्षक राहुल वाघ , उपनिरिक्षक रामकृष्ण सोनवणे , हवालदार भागवत पवार , दौलत ठोंबरे आदींचे पथक तयार करुन गावठी पिस्तुलांची तस्करीची साखळी खिळखिळी करण्याच्या सुचना केल्या .

     पोलिसांनी सापळा लावून संशयित संतोष ठाकरेकडून ( रा.विंचूर ) दोन पिस्तूल , १४ काडतुसे , केशव ठोंबरे ( रा.पिंपळद ) याच्याकडून एक गावठी कट्टा व चार काडतुसे तसेच संशयित सागर वाघकडू एक गावठी कट्टावदोन काडतुसे हस्तगत करण्यात आली .

एजंट , हेल्परांच्याही बांधल्या मुसक्या गावठी पिस्तूल व काडतुसे बाळगणाया संशयित चौघांच्या संपर्कात राहून संभाव्य खरेदीदार शोधून देणे तसेच पिस्तुलांच्या वाहतुकीसाठी मदत करणारे संशयित दीपक पोळ , पंकज चंद्रकांत वानखेडे , विनोद सोपान तांबे , अजीम अल्ताफ शेख , करण जेऊघाले , पवन आनंद नेटारे यांच्याही मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले आहे . गुन्ह्यात पोलिसांना सराईत गुन्हेगार सायमन ऊर्फ पापा पॅट्रिक मनवेलसह मध्य प्रदेशामधील उमटी गावातून देशी पिस्तूल , काडतुसांचा पुरवठा करणारा म्होरक्या शेखर भाई यांना अटक करण्याचे आव्हान आहे .

     निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये , यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह मनमाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध शस्र बाळगणारे तसेच तस्करी करणायांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.