सानिया कादरी यांनी केळी उत्पादकांची देणी न्यायालयीन तडजोडीत केली मान्य
सानिया कादरी यांनी केळी उत्पादकांची देणी न्यायालयीन तडजोडीत केली मान्य
रावेर प्रतिनिधि:- भुसावळ येथील केळी व्यापारी सानिया कादरी यांनी सन 2017 मध्ये रावेर तालुक्यासह जिल्ह्याभरातील शेकडो केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळी विकत घेतली होती. परंतु त्या शेतकऱ्यांना त्या केळीचा मोबदला मिळालेला नव्हता. शेतकऱ्यांनी सानिया कादरी यांच्या विरोधात निभोरा पोलीस स्टेशनला सुमारे 40 लोकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यावेळी सानिया कादरी यांनी शेतकऱ्यांना केळीचा पैशा पोटीS चेक दिले होते. तेच धनादेश न वाटल्यामुळे तांदळवाडी येथील शशांक उमेश पाटील यांनी न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जिल्हाभरातील करोडो रुपये सानिया कादरी यांच्यावर असल्याने शेतकऱ्यांना उद्रेक झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने सानिया कादरी यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.दि.23 नोव्हेंबर रोजी रावेर येथील न्यायालयात सानिया कादरी यांचे वकील आले होते.त्यांनी तांदळवाडी येथील प्रशांत पाटील यांचे 1 लाख 97 हजार 435 रुपये आणि न्यायालयीन खर्च देण्याचे मान्य केले.असल्याने शशांक पाटील तांदळवाडी यांना सानिया कादरी यांच्या कडून पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत