Contact Banner

सावद्यात गुप्त माहिती वरून पोलिसांनी सुमारे १० लाखाचा तंबाखू ट्रकसह केला जप्त १ अटक १ फरार

 

सावद्यात गुप्त माहिती वरून पोलिसांनी, सुमारे १० लाखाचा तंबाखू ट्रकसह केला जप्त  १ अटक १ फरार

सावदा (प्रतिनिधी) –  येथील सावदा – फैजपूर रोडवर सावदा पोलिसांनी  सकाळी मिळालेल्या गुप्त कॉल च्या माहिती वरून सापळा रचून डायमंड टोल काट्या समोर एक ट्रक मधून सुमारे ६ लाख ७२ हजारांचा आरोग्यास अपायकारक  असलेला मिराज तंबाखू व ट्रक असा सुमारे १० लाखाचा मुद्दे माल जप्त केला, असून याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी १ व्यक्तीस अटक करण्यात आली तर १ जण फरार झाला, 

          याबाबत सविस्तर वृत्त असे की सावदा येथील सावदा – फैजपूर रोड वरील डायमंड तोल  काट्या समोर सार्वजनिक जागी दि २५ रोजी  मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावळा रचून सकाळी ९.३० वाजे दरम्यान ट्रक क्रमाक एम.पी. ०९ / के,सी. ६८९७ हा उभा असताना यात संशयास्पदरित्या माल असल्याचा संशय आल्याने त्यास सावदा पोलीस स्टेशनला आणल्यावर तपासणी केली असता त्यात विक्रीस परवानगी नसलेला “मिराज” तंबाखू आढळून आला, यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांना माहिती कळविण्यात आली,


       अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांनी सावदा येथे आल्यावर तपासणी केली असता सदर ट्रक मधून ६७२००० रु किमतीचे २० एच डी पी इ बॉक्स एका बॉक्स मध्ये ४ कार्टून बॉक्स व प्रत्येक कार्टून बॉक्स मध्ये ४२ लहान बॉक्स मध्ये “मिराज” तंबाखू असा मुद्दे माल आढळून आला, सदरचा पदार्थ मानवी जीवनास अत्यंत हानिकारक असल्यामुळे सदरचा पदार्थ हा राज्यात उत्पादन, निर्मिती, साठवण, वाहतूक, व विक्रीस प्रतिबंध असताना त्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने सदर ट्रक चालक व सोबत असलेला या दोघांवर सावदा पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यातील चालक निर्मल मिलन सोलंखी,हा फरार झाला तर त्याचा साथीदार कमल सुभान मन्सुरे यास अटक करण्यात आली असून हे दोघे रा, बागफल, ता – बडवा, जि – खरगोन, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत,

      यातील आरोपी विरुद्ध अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव अरविंद वसंत कांडेलकर यांचे फिर्यादीवरून सावदा पो.स्टे.ला भाग ५, गु,र,नं. ५६/२०२०, भाद्वी ३२८,२७२,२७३,१८८,३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि, उनवणे, नेमणूक निभोरा पो.स्टे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक, आर.डी,पवार, पो.हे.का. संजय चौधरी, व सहकारी करीत आहे.

गुप्त माहिती वरून सापळा रचणारे पीसीओ सुरेश आढायगे, पी एस आय राजेंद्र पवार, उमेश पाटील,रिजवन पिंजारी,विशाल खैरनार,तुषार मोरे सामील होते.

      दरम्यान सावदा परिसर हा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, व गुटखा विक्रीचे मोठे केंद्र ठरत असून येथून मध्यप्रदेश सीमा जवळ असल्याने येथून मोठ्या प्रमाणत गुटखा तस्करी होत असते पोलिसांनी या कार्यवाही प्रमाणे सातत्य ठेवत यावर अंकुश लावणे आवश्यक ठेवत गुटखा तस्करांनवर लगाम लावणे आवश्यक आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.