एकनाथराव खडसे यांच्या वर आरोप करणाऱ्या लोढा यांचा सावद्यात राष्ट्रवादी तर्फे पुतळा जाळून निषेध
एकनाथराव खडसे यांच्या वर आरोप करणाऱ्या लोढा यांचा सावद्यात राष्ट्रवादी तर्फे पुतळा जाळून निषेध सावदा प्रतिनिधी:- राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर बेशुट,बेताल व बिन बुळाचे आरोप करणाऱ्या जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांचा राष्ट्रवादीचे नगर सेवक व कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून व घोषणाबाजी करून आज दि.२६ रोजी निषेध व्यक्त केला आहे.
बस स्थानक समोर दुर्गा माता मंदिर समोर असलेल्या बनाना सिटी शिल्पा जवळ राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, विरोधी गटनेते नगरसेवक फिरोज खान पठाण ,नगरसेवक सिद्धार्थ बडगे,किशोर बेंडाळे,नगरसेविका मीनाक्षी कोल्हे,विजया जावळे, रेखा वानखेडे ,सुभद्राबाई बडगे, चारुदत्त वानखेडे,हरी मामा परदेशी,साई राज वानखडे,प्रसाद वानखेडे आदींनी लोढा यांच्या पुतळ्याला काळे फासून,चपलानी मार देऊन दहन केले व निषेधाच्या घोषणा दिल्या.
लोढा हा स्वतःला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणवतो पण तो आमच्या पक्षाचा साधा सदस्य सुद्धा नाही.त्याने आमचे नेते खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न दिसत आहे.हे असले आरोप पुढच्या काळातही सहन केले जाणार नाही राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे खडसे यांच्या पाठीशी आहेे आणि राहील असे वानखेडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत