Contact Banner

तरुणीवर अत्याचार , बळजबरीने केला गर्भपात

 


तरुणीवर अत्याचार , बळजबरीने केला गर्भपात

 प्रतिनिधी यावल -तालुक्यातील अट्रावल येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केले . तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले . तसेच लग्नाला नकार दिल्याने संबंधितांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला . 

      अट्रावल येथील श्रावण कैलास कोळी याने पीडितेशी परिचय वाढवला . यानंतर विश्वासात घेत तुझ्याशी मी लग्न करेल , असे आमिष दाखवले . तिच्यासोबत १ सप्टेंबर २०१९ पासून ते ५ डिसेंबर २०२० दरम्यान संशयिताच्या गावातील राहत्या घरी व इतर ठिकाणी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले . त्यातून ती गरोदर झाल्याने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपातासाठी भाग पाडले . वर्ष उलटूनही संबंधिताने लग्न केले नाही . पीडितेने लग्नासाठी आग्रह धरल्यावर श्रावण कोळीने लग्नाला नकार दिला . याप्रकरणी पीडितेने यावल पोलिस ठाण्यात कोळी विरुद्ध गुन्हा दाखल केला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.