सट्याच्या पाच अड्यांवर कारवाई , ९ जणांना अटक अवैध धंद्यावाल्यात खळबळ
सट्याच्या पाच अड्यांवर कारवाई , ९ जणांना अटक अवैध धंद्यावाल्यात खळबळ
प्रतिनिधी | भुसावळ - एलसीबीच्या पथकाने शहरातील न जळगावरोड वरील सट्याच्या अड्डयावर छापा टाकून सोमवारी नऊ संशयितांना अटक केली . या कारवाईत ४८ हजार ८० रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त न करण्यात आली . शहरातील जामनेर रोडवर सट्टा च्या अड्यांवर एलसीबीच्या पथकाने ने कारवाई केली . यात नाहाटा चौफुली , दीनदयाल नगराजवळून संशयीत कृष्णा महालेकर ( रा . नेब कॉलनी ) , व संदीप अशोक चौधरी ( रा . दीनदयालनगर ) यांच्या ताब्यातून १४ हजार ५०० रुपये रोख जप्त केले . दुसऱ्या कारवाईत अष्टभूजा देवी मंदिर परिसरातून संशयित रवींद्र रामदास वारके ( रा . हनुमाननगर ) यास अटक करुन चार हजार १८० रुपयांच्या रोकड जप्त करण्यात आली . सोनिच्छावाडी भागातील न तिसऱ्या कारवाईत संशयित संतोषलाल गिरीलाल ( रा . खडकारोड ) व गोपाल द्वारकादास अग्रवाल ( रा . शनी मंदिर वॉर्ड ) यांच्या ताब्यातून ६ हजार ९८० रुपयांची रोकड जप्त केली . चौथ्या कारवाईत सोनिच्छावाडी परिसरात संशयित प्रल्हाद हरी सपकाळे - ( रा . दीनदयाल नगर ) छोटेलाल ब्रिजलाल ( रा . गांधीनगर ) यांच्या ताब्यातून १० हजार ९ २० रुपयांची रोकड जप्त केली . पाचव्या कारवाईत सोनिच्छावाडी नगरजवळ संशयीत संतोष शंकर तायडे ( रा . तुळशीनगर ) व मारोती वेडू भालेराव ( रा . शिवपूर कन्हाळा ) यांच्या ताब्यातून ११ हजार ५०० रुपये जप्त केली . जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन , शरीफ काझी , युनूस शेख , किशोर राठोड , विनोद पाटील , रणजीत जाधव तसेच रवी नरवाडे , रमेश चौधरी , अनिल इंगळे , शरद भालेराव , दादाभाऊ पाटील , संतोष मायकल , इद्रीस - पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली . यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत