Contact Banner

पारोळ्यातील बेकायदेशीर शाळांची होणार चौकशी

 

पारोळ्यातील बेकायदेशीर शाळांची होणार चौकशी 

parolyat bekaydeshir shalanchi honar chaukashi

 प्रतिनिधी । पारोळा  शहरासह तालुक्यात वर्षभरात प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा ८ शाळा बेकायदेशीरपणे स्थलांतर व नूतनीकरण करून दाखल झाल्याची तक्रार १० मुख्याध्यापकांनी केली आहे . या अनुषंगाने शहरातील प्राथमिक शाळांची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा , असे आदेश जळगावच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पारोळा गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत . यामुळे खळबळ उडाली आहे . तालुक्यात वर्षभरात ३ प्राथमिक , ५ माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण ८ शाळा दाखल झाल्या . हा प्रकार पाहता शहरातील साने गुरुजी प्राथमिक शाळेसह १० मुख्याध्यापकांनी शिक्षण मंत्री , संचालक , शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या . त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलोडे यांनी प्राप्त तक्रारीच्या चौकशीसाठी पारोळा गट शिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक केली . संबंधित प्रकरणाची - १५ दिवसात चौकशी करून अभिप्रायासह चौकशी अहवाल देण्याचे आदेश ६ जानेवारीला दिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.