Contact Banner

बस चालकाने प्रसंगावधान राखत पंचेचाळीस प्रवाशांची वाचवले प्राण

 

बस चालकाने प्रसंगावधान राखत पंचेचाळीस प्रवाशांची वाचवले प्राण bas chalkane prasagavdhan rakhat vachavle 45pravashanche pran

 बोदवड प्रतिनिधी-तालुक्यातील सुरवाडे गावा जवळ धावणाऱ्या एसटी बसचे स्टेरिंग अचानक लॉक झाले .मात्र या कठीण प्रसंगी बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बस मधील ४५प्रवाशांचे प्राण वाचवले. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता ही घटना घडली.

      जळगाव बोदवड बस क्रमांक एम एच २०बी एल १५९६ घेऊन चालक जगदीश देवचंद लोखंडे वय ३७ येथून जळगाव ला जाण्यासाठी निघाले सुरवाडे मार्गे जात असताना सुरवाडे खुर्द येथे प्रवाशांना उतरवण्यासाठी बसचा  वेग कमी  करण्यासाठी गाडीचा ब्रेक दाबला असता अचानक बसचे स्टेरिंग लॉक झाले रिमझिम पाऊस सुरू असल्याने ब्रेक दाबताच  गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धडकली .त्यामुळे बसच्या दर्शनी भागाचे काच फुटून  नुकसान झाले. मात्र यात  बस चालकाने मोठे प्रसंगावधान दाखवल्याने ४५प्रवाशांपैकी कुणीही जखमी झाले नाही .परंतु एसटी बसचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या अपघाताची खबर स्वतः बसचालक जगदीश लोखंडे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात दिली सुदैवाने या अचानक घडलेल्या अपघातात जीवितहानी टळल्याने बस मधील प्रवाशांचा  जीव भांड्यात पडला. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या काहींना खरचटले आहे. मात्र त्यांनी बस चालक लोखंडे यांच्या प्रसंगावधानचे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.