ईडी कडून वर्षा राऊत यांची साडेतीन तास एक दिवस आधी चौकशी
ईडी कडून वर्षा राऊत यांची साडेतीन तास एक दिवस आधी चौकशी ला हजर varsha raut yanchi edi kadun sadetin tas chaukashi
मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सोमवार दुपारी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने साडेतीन तासापर्यंत चौकशी करण्यात आल्याचे समजते याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही .
पंजाब महाराष्ट्र बँक गैरव्यवहार प्रकरणी वर्षा राऊत यांना चौकशी साठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते .यावर त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेळ वाढवून मागितला होता त्यानंतर त्यांना ५ जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितले मात्र वर्षा राऊत एक दिवस आधी म्हणजे सोमवार दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यालयात हजर झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काही कागदपत्रे दिसून आली सुमारे साडेतीन तासांनंतर त्या बाहेर पडल्या दरम्यान वर्षा राऊत यांच्या प्रवेशावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी त्या सोमवारी चौकशीसाठी हजर झाल्याचे सांगण्यात येते.
यापूर्वीही ईडी पथकाने याच प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यातून झालेल्या ५५ लाख रुपयाचे व्यवहाराचा तपशील जाणून घेण्यासाठी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पाचारण केले होते त्याबद्दल संजय राऊत यांनीही त्यांना माहिती दिली होती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत