Contact Banner

केळी उत्पादकांची नवीन वर्षातही निराशा


 केळी उत्पादकांची नवीन वर्षातही निराशा keli utpadkanchi navin varshatahi nirasha

 सावदा प्रतिनिधी-  नवीन वर्षात केळीची मागणी वाढून दरही वाढतील , अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा होती . मात्र कांदेबाग १११५ व पिलबाग १ हजार २५ रुपयांवर स्थिरावला आहे . बोर्डाचे दर एक हजारांवर दिसत असले तरी केळीला गुणवत्ता नसल्याचे सांगत प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये कमी देवून ६०० ते ७० रुपये प्रतिक्विंटलने केळीची खरेदी होत आहे . यामुळे केळी उत्पादकांच्या पदरी निराशा कायम आहे . नवीन वर्षात केळीचे दर सुधारतील अशी अपेक्षा होती . मात्र दर कायम आहेत . गेल्या दोन महिन्यांच्या काळात केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे . डिसेंबर महिना केळीसाठी कर्दनकाळ ठरला होता . रावेर येथे कांदेबागआणि पिलबाग केळीचे भाव सध्या निघत आहेत . कांदेबाग १११५ व पिलबाग १ हजार २५ रुपये दर आहे तर सहा रुपयांचा फरक मिळत आहे . फरकाची रक्कम तर दूरच  पण केळीला सध्या बोर्डाचे जाहिर - झालेले दर देखील मिळत नसल्याची स्थिती कायम आहे . प्रतीक्विंटल | किमान ३० ते ४० रुपये कमी दर मिळत असल्याने केळीची सध्या ६०० ते ७०० रुपयांमध्ये कापणी होत आहे . उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढले आहे , तर इतर - राज्यांमध्येही थंडीची लाट कायम आहे . बाजारात हिवाळ्यात येणाऱ्या  सिझनेबल फळांची मागणी वाढली आहे . यामुळे हिवाळ्यात केळीची - मागणी कमी झाली आहे . त्यातच , उत्तरेकडील राज्यांमध्ये धुक्यामुळे केळीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे . आगामी काळात दर  वाढतील , अशी शक्यता आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.