जळगाव जिल्ह्यात आज ६६ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ६६ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज ०१ जानेवारी २०२१ च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.३० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ५५ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५४१३३ आहे . जिल्ह्यात सध्या ४५९ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ६६ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५९२१ झाली असून आज पर्यंत १३२९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ६६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील २२ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०२ , भुसावळ १३, अमळनेर ०२ , चोपडा ०८ ,पाचोरा ०१ , भडगाव ०२,धरणगाव ००, यावल ०७, एरंडोल ००, जामनेर ०१, रावेर ०२,पारोळा ००,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०२, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०० असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत