Contact Banner

किनगाव च्या जखमी महिलेचा ही मृत्यू

 

किनगाव च्या जखमी महिलेचा ही मृत्यू  kingaon chya jakhami mahilechahi mrutu

यावल प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी चौधरी कुटुंबीयांच्या कारला गुजरात राज्यात शनिवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात चालक गणेश पाटील वय २३ यांचा मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान रविवारी पहाटे गंभीर जखमी कांचन चौधरी ४४ यांचाही मृत्यू झाला .किनगाव येथील डॉक्टर विजय चौधरी वय ५०त्यांच्या पत्नी कांचन चौधरी मुलगा ,निखिल चौधरी वय ८ व कारचालक गणेश पाटील वय २३ हे कारद्वारेआहे शनिवारी गुजरात मधील वडताल येथे स्वामीनारायण मंदिरात जात होते. तीन वाजेच्या सुमारास राजकोट जवळ धुंधका गावाजवळ त्यांच्या कारला टॅंकरने समोरून जबर धडक दिल्याने कारचा चुराडा झाला. या अपघातात चौघे जण गंभीर जखमी झाले तर या दरम्यान गणेश पाटील यांचा शनिवारी मृत्यू झाला तर त रविवारी पहाटे पूर्वी कांचन चौधरी यांचाही मृत्यू ओढवला .दरम्यान किनगाव येथून चंद्रकांत पाटील माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील यांच्यासह अनेक जण गुजरातला पोहोचले असून जखमींवर अहमदाबाद येथे उपचार सुरू आहे .मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह आणण्यात  येत असून त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. गावातील सार्वजनिक कार्यक्रम केले रद्द गावातील कुटुंबावर झालेले अपघात यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यामुळे रविवारी गावात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रद्द करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.