Contact Banner

३८ वर्षीय महिला ट्रक च्या धडकेत ठार.

 

३८ वर्षीय महिला ट्रक च्या धडकेत ठार.38 varshiy mahila track chya dhadket thar

रावेर प्रतिनिधी- तालुक्यातील भोकरी फाट्यावर दुपारी  कंटेनर ट्रकने मोटारसायकल ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावर भोकरी फाट्यावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली.      

      मंगलाबाई सोपान शिरसाठ वय ३८ रा वखारी ता जि बऱ्हाणपूर ही महिला जागीच ठार झाली असून तिचा पती या अपघातात गंभीर जखमी झाला आहे .

   वखारी येथील रहिवासी असलेले सोपान कडू शिरसाठ हे पत्नी मंगलाबाईसह केऱ्हाळा खुर्द येथील मंगलाबाईच्या आजीची तब्बेत खराब असल्याने भेट घेण्यासाठी शनिवारी आलेले होते. ते  दुपारी दीड वाजता  वखारी येथे मोटारसायकल क्रमांक-एम पी १२  एचडी ९१५८ ने जात असताना रावेरकडून बऱ्हाणपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक- एमपी ०७ एचबी  ३३७१ ने जोरदार धडक दिल्याने  मंगलाबाई जागीच ठार झाली.  तर तिचा पती सोपान शिरसाठ हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत .त्यांना पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे पाठविण्यात आले आहे. याबाबत रावेर येथील पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून चालक रामप्रसाद जगदीशसिंग यादव रा गोरमी ता मेहेगव जि भिंड मध्यप्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.