Header Ads

Header ADS

वरणगावात तरूणाची निघृण हत्या , ४ ताब्यात


 

वरणगावात तरूणाची निघृण हत्या , ४ जण ताब्यात  

 भुसावळ प्रतिनिधी -  तालुक्यातील वरणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील महालक्ष्मी सॉमीलजवळ सोमवार (दि .७ ) रात्री १०.१५ चार  तरुणांनी सचिन जिवराज मगरे ( वय २५ ) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही माहिती मिळताच पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून अवघ्या सहा तासांतच संशयितांना अटक केली.     #lewajagat

      सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सहा महिन्यांपूर्वी भोला इंगळे यांच्या नातीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सचिन मगरे हा नाचत होता. यावेळी अजय तायडे व अन्य दोघांशी त्याचे वाद झाले होते. त्यावेळी सचिनला मारहाण झाली होती. तसेच संबंधितांनी सचिनला भोगावती नदीपात्रात साचलेल्या सांडपाण्यात फेकून दिले होते. मात्र , त्यावेळी भीमराज मगरे यांनी माफी मागितल्याने वादावर पडदा पडला होता. सोमवारी ( दि .७ ) रात्री हा पुन्हा उफाळून आले . त्यात सचिन मगरे ( वय २५ , रा आंबेडकर नगर , वरणगाव ) हा १०.१५ वाजेच्या सुमारास डॉ.आंबेडकर नगरजवळील महालक्ष्मी सॉ मिल जवळ जीमवरून दुचाकीने आला . ते राहुल गजानन कदम ( वय २४ ) , अक्षय संजय भैसे ( व २३ ) , अजय रवींद्र तायडे ( वय २१ ) आणि एक अल्पवयीन संशयीताने धारदार शस्त्राने सचिनच्या मानेवर , पाठीवर वार केले . ही माहिती मिळताच भीमराज मगरे यांनी घटनास्थळ गाठून भावाला दवाखान्यात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.खुनाची माहिती कळताच डीवायएसपी विवेद लावंड , वरणगावचे एपीआय संदीपकुमार बोरसे घटनास्थळी आले.परिसरात बंदोबस्त वाढवला. तसेच पहाटेच वरणगावात आलेल्या फॉरेन्सिक लॅब पथकाने घटनास्थळी पडलेल्या रक्ताचे नमुने घेतले.

    पहाटे चारला चौघांना पकडले 

    सचिनच्या खून प्रकरणी भीमराज मगरे ( रा.डॉ.आंबेडकर नगर वरणगाव ) यांच्या फिर्यादीनुसार राहुल गजानन कदम ( व २४ ) , अक्षय संजय भैसे ( वय २३ ) , अजय रवींद्र तायडे ( व २१ ) व एक अल्पवयीन संशयित अशा चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला . यानंतर अवघ्या सहा तासांत पोलिसांनी राहुल,अक्षय व अजयला अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालया हजर केल्यावर चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

        संशयितांनी सचिनच्या मानेवर तीन , तोंडावर एक , पाठीवर , छातीवर दोन वार केले . त्यामुळे तो घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.