खा.नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळांना मिळू शकते संधी
खा.नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळांना मिळू शकते संधी
प्रतिनिधी मुंबई:- अमरावतीच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या खासदार नवनीत राणा - कौर यांचे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावला . तसेच त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला . शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी नवनीत यांच्या वैधता प्रमाणपत्राविरोधात २०१ ९ मध्ये मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती . अडसूळ यांनी सांगितले की , आता कोर्टाचे निकालपत्र आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाला लवकरच सुपूर्द करणार आहोत . आयोग त्यावर कायदा सुनावणी घेऊन निर्णय देईल . राणा यांना त्यांच्याकडील कागदपत्रे जमा करण्यास कोर्टाने ६ आठवड्यांची मुदत दिली आहे . पण , आजच्या आदेशाला स्थगिती दिलेली नाही .
उमेदवार आनंदराव आनंदराव अडसूळ यांचे आरोप नवनीत राणा यांनी २०१४ मध्येही बोईसर महापालिका शाळेतून वडिलांचे खोटे जात प्रमाणपत्र प्राप्त केले होते . त्यावर पडताळणी करून निवडणूक लढवली . मात्र तेही २०१५ मध्ये कोर्टाने अवैध ठरवले . • नवनीत राणा यांनी २०१७ मध्ये आजोबांचे जात प्रमाणपत्र खोटे बनवले . त्याद्वारे वैधता केली . आमच्या संशोधनानुसार त्यांची जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे खोटी होती . मात्र जात पडताळणी समित्या त्यांना मॅनेज झाल्या होत्या .कायदा काय सांगतो : ... तर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्यास संधी राज्यघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्या माहितीनुसार , भारतीय प्रतिनिधित्व कायदा १ ९ ५१ अन्वये जात वैधता प्रमाणपत्र खोटे ठरल्यास हायकोर्ट अशा खासदाराची खासदारकी रद्द करू शकते . किंवा त्याच्या संसद सदस्यत्वास स्थगिती देऊ शकते . किंवा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवारास विजयी म्हणून घोषितही करू शकते . तथापि , प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारास सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा अधिकार असतो .असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात जाणार : नवनीत . कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे . पण या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे . आधी सुप्रीम कोर्टाच्या अधीन जात पडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र तीन वेळा पूर्ण छाननी करून वैध सादर केला होता . हायकोर्टाच्या मंगळवारच्या निर्णयाचा आदर व घटनादत्त अधिकाराचा पूर्ण वापर करून माझी सत्य भूमिका सुप्रीम कोर्टात जाऊन मांडणार आहे . तेथे सत्याचाच विजय होईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत