Header Ads

Header ADS

लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात


 

लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ प्रतिनिधी । वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या वरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबला ॲन्टी करप्शन पथकाने रंगेहात पकडल्याने  दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.lewajagat.com/2021/06/tarunacha.vadhdivshich.zala.vijechya.dhakyane.mrutu.html

    अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. वरणगाव पोलीस हद्दीत वाळूची वाहतूक करतांना पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (वय-५६) रा. भिरूड कॉलनी जळगाव आणि गणेश महादेव शेळके (वय-३१) रा. पोलीस वसाहत वरणगाव यांनी कारवाई केली. कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक सुनिल वाणी यांनी १० हजाराची लाचेची मागणी केली. आज दुपारी ११ वाजेच्या सुमारास गणेश शेळके हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारकडून १० हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दोघांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलीस उपअधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.नि. लोधी, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.