Header Ads

Header ADS

तरुणाचा वाढदिवशीच झाला विजेच्या धक्क्याने मृत्यू


 

तरुणाचा वाढदिवशीच झाला विजेच्या धक्क्याने  मृत्यू 

 प्रतिनिधी दसनूर:- दसनूर तालुका रावेर येथील तरुणाचा विजेच्या धक्क्याने वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अमित उर्फ ओम  पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे.   

https://www.lewajagat.com/2021/06/Anturli.fata.Yethil.police.chauki.akher.madhyapradesh.hadit.kha.rakshatai.khadsenche.burhanpur.jilhadhikari.yana.adesh.html 

       दसनूर येथील रहिवासी अविनाश बाजीराव पाटील यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. अमित नेहमी शेतीच्या कामात व्यस्तअसायचा.त्यामुळे तो फार वेळा या नव्या घराकडे येत नसे. परंतु बुधवारी थोडा वेळ मिळाल्यामुळे तो फिरताना नवीन बांधकामावर आला तो गच्चीवर उभा होता. तेथून त्यांच्या घराजवळूनच विजेचा मुख्य प्रवाह असलेल्या तारा गेल्या असून तेथे त्याचा तारेशी स्पर्श होऊन विजेच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे बुधवारीच या तरुणाचा वाढदिवस होता. आणि याच दिवशी मागील वर्षी त्याचा साखरपुडाही झाला होता. आप्तांनी एकच आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई , वडील , पत्नी , बहीण आजी , काका , काकू भाऊ असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.