Header Ads

Header ADS

भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे कोरोना विषाणू बाबत जनजागृती

भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे कोरोना विषाणू
 बाबत जनजागृती 

उरण प्रतिनिधी(सुनिल ठाकूर ):- कोरोना प्रादुर्भावाने विस्कळीत झालेले जनजीवन सावरायला लागताच कोरोनाच्या तिसरया लाटेचे आगमन होण्याची चिन्ह दिसत आहेत .या रोगाची योग्य खबरदारी व नीट काळजी घेतली तर या रोगाला सुरक्षित राहता येइल.त्यासाठी विशेष मार्गदर्शन व जनजागृती ची गरज पाहता नेहमीच तत्पर असलेले भेंडखळ ग्रामपंचायत च्या वतीने सुद्धा गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी  आज दिनांक 27जुन 2021 रोजी गावातील विट्ठल मंदिरात डॉ.सूरज मढवी (जसखार ).यांच्या द्वारे कोरोनाच्या तिसर्या लाटे पासुन बचावा साठी .सुरक्षे साठी मार्गदर्शन करुन जनजागृती केली.
  यावेळी सरपंच भाग्यश्री चव्हाण.उपसरपंच श्री लक्ष्मण ठाकूर.ग्रामपंचायत सदस्य .कृष्णा ठाकूर.किशोर ठाकूर.रतन ठाकूर.सौ.सोनाली ठाकूर.सौ.निता ठाकूर.सौ.सुचिता  ठाकूर.सौ.स्वाती घरत.सौ.योगिता ठाकूर सौ.संध्या ठाकूर.सौ.नीलम भोईर.निशा वशेणीकर.दीपा माटे.हसुराम भोईर.लिलेश्वर ठाकूर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.