धक्कादायक:-तिवसात शिवसेना शहरप्रमुखाचा खून
धक्कादायक:-तिवसात शिवसेना शहरप्रमुखाचा खून
प्रतिनिधी तिवसा:- पूर्ववैमन्यासातून शिवसेना शहरप्रमुखाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून खून केल्याची घटना तिवसा येथे शनिवारी ( दि . २६ ) रात्री घडली . याप्रकरणी तिवसा पोलिसांनी चौघांना अटक केली . शिवसेना शहरप्रमुख अमोल जनार्दन पाटील ( ३८ ) मित्रासोबत आशीर्वाद बारमध्ये पार्टी करत होता . तेव्हा जुन्या वादातून मृत पाटील व आरोपींमध्ये झटापट झाली . त्यांनी अमोलच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डोक्यात धारदार शस्त्राने वार करत जागीच ठार केले .
याप्रकरणी संदीप रामदास ढोबाळे , प्रवीण रामदास दोबाळे , अविनाश एकनाथ पांडे आणि रुपेश घागरे यांना अटक केली , तर एक जण फरार झाला . दरम्यान , मृत पाटील याच्यावरवरही अनेक गुन्हे दाखल होते . तसेच त्याला तडीपारही करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत