कोरोनाने छत्र हरपलेल्या १३ बालकांच्या नावे प्रत्येकी ५ लाखांची एफडी करणार बालके कुठली सविस्तर वाचा
कोरोनाने छत्र हरपलेल्या १३ बालकांच्या नावे प्रत्येकी ५ लाखांची एफडी करणार
बालके कुठली सविस्तर वाचा
प्रतिनिधी जळगाव:- कोरोनामुळे आई - वडिलांचे छत्र हिरावले गेलेल्या १३ बालकांचे बँक खाते काढून त्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट जमा करण्यात येणार आहे . त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे वडिलांच्या मालमत्तेला त्यांना वारस लावण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली .
https://www.lewajagat.com/2021/06/alpavayin.balikevar.atyachyaracha.praytan.html
जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्या आई - वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले . त्यानुसार १८ वर्षांच्या आतील ४१७ मुलांचे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे . १३ बालकांचे मातृ - पितृ छत्र हिरावले गेले आहे . १८ वर्षांवरील ५५ युवकांचे मातृ किंवा पितृ छत्र हिरावले गेले आहे . मातृ - पितृ छत्र हिरावल्या गेलेल्या १३ बालकांचे बँक खाते उघडून त्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपयांचा एफडी जमा करण्यात येणार आहे . त्यासाठी ६५ लाख रुपयांच्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात आली . ही एफडी त्यांना वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा शैक्षणिक कारणास्तव काढता येणार आहे . त्यांच्यावर दबाव टाकून कुणी एफडी काढून घेऊ शकणार नाही , याबाबत प्रशासनाकडून काळजी घेण्यात येईल . त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पोलिस विभागालाही सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात दोन्ही पालक दगावलेल्या बालकांमध्ये चोपडा २,जळगाव ४ , सावदा ४ , वरणगाव १ व बोदवड २ अशा एकूण १३ बालकांचा समावेश आहे .
शैक्षणिक फी भरणार , बालसंगोपन मदत सुरू .... आई - वडील दगावलेली मुले इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शिकणारी आहेत . त्यांचे शैक्षणिक शुल्क शासन भरणार आहे . याबाबत महिला व बाल विकास अधिकारी परदेशी हे त्या मुलांच्या शाळांना भेटी देत आहेत . या मुलांना दरमहा अकराशे रुपयांप्रमाणे बालसंगोपन मदत सुरू करण्यात आली आहे . वडिलांच्या मालमत्तेवर त्यांना वारस लावण्याची कार्यवाही मुख्य जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानंतर करण्यात येणार आहे . त्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून त्यांना पत्र देण्यात आले आहे.त्यांच्या आदेशानंतर तहसीलदार मुलांच्या वडिलांच्या मालमत्तेवर त्यांची वारस नोंद घेण्याची कार्यवाही करतील .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत