जगभराचे लक्ष वेधून घेणारे हे हत्ती 500 कि.मी चालून नेमके जात कुठे आहेत
जगभराचे लक्ष वेधून घेणारे हे हत्ती 500 कि.मी चालून नेमके जात कुठे आहेत....
बातमीला जोडलेला फोटो तुम्ही बघितला असेलच. असा झोपलेला हत्ती किंवा इतके झोपलेले हत्ती मी सुद्धा कधी पाहिले नव्हते तसेच जगभरातल्या बऱ्याच लोकांनी शांत निजलेले हत्ती कधी बघितले नसतील. म्हणून हे फोटोग्राफ जगभरात अत्यंत व्हायरल होत आहेत.
पण हे नेमकं काय प्रकरण आहे..?
तर हा एकूण पंधरा हतींचा कळप आहे आणि एक छोटा हत्ती(Elephant Calf )धरला तर सोळा. हे आशियाई हत्ती जंगलातील नैसर्गिक अधिवास सोडून आतापर्यंत तब्बल पाचशे कि.मी.चा प्रवास करून अजुनही ते चालतच आहेत.
हे हत्ती शेतशिवारं गावं शहरं ओलांडत, पार करत अजूनही न थांबता नेमके कुठे जात आहेत. हे कोणालाही ठाऊक नाहीये. आणि हे कुठून केव्हा किती तारखेला निघाले याचेही अंदाजच लावले जात आहेत.
हे हत्ती चीनच्या युन्नान राजधानीत दिसले होते. तिथून आता चीनचे सरकारी अधिकारी ड्रोनच्या माध्यमातून यांच्यावर नजर ठेवून आहे. त्यामुळे हत्तींचे मजेशीर फोटो, व्हिडीओ वारंवार समोर येत असून जगभर गाजत आहेत.
एक व्हिडिओ
त्यांच्या पैकी एका छोट्या हत्तीने आंबविलेले धान्य(Fermented grains) खाल्यामुळे त्याला धुंदी चढली आहे. आणि हाच व्हिडीओ बघून युन्नानचे लोकल संगीतकार त्यांच्यावर गाणं लिहिणार. असं बोललं जातं आहे.
त्यात असे शांत निजलेले हत्ती हा फोटोसुद्धा खुप भन्नाट व्हायरल होतो आहे. एवढ्या कटकटीच्या, धावपळीच्या आणि निराशेच्या काळात कोणाला तरी शांततेत जगता येत आहे. झोपता येत आहे. असं सर्व नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना बघून आपल्यालाही खरोखर तसंच शांत वाटतं. त्यांच्या क्यूटनेस मुळेच मलाही हा फोटो लै आवडला आहे.😊
पण हे हत्ती 500 की.मी. चालून नेमके जात कुठे आहेत.
चीनमधील व जगभरातील जाणकारांनी यावर बरेच मते नोंदविली आहेत.
काही जण म्हणतात, की हे त्यांचं नवीन Habitat असू शकतं.
काही म्हणतात, हत्तींना दुष्काळाची आधीच जाणीव होऊन जाते म्हणून ते स्थलांतर करत आहेत.
त्यापैकी
शिशुआंगबन्ना येथील
"झिशू हुआदोंग"
IFAW (INTERNATIONAL FUND FOR ANIMAL WELFARE) चे माजी संचालक म्हणाले.
"गेल्या वीस वर्षांत आशियाई हत्तींच्या संरक्षणामुळे त्यांची संख्या वाढली आहे परंतु संरक्षित क्षेत्राबाहेर व्हर्जिन जंगलाच्या घटत्या कारणामुळे त्यांच्या राहण्याची जागा कमी झालीय. म्हणून हत्ती ज्या ठिकाणी मानव कार्यरत आहेत तेथे पसरत आहेत."
हा पंधरासोळा हत्तींचा कळप आणि त्यांचा 500 किमीचा प्रवास आणि त्यांच्या फोटो व्हिडीओमुळे हा कळप जगभराचा विषय झाला आहे. आणि का म्हणून शहरात निघाले आहेत याबद्दल सर्वानाच कूतूहलता आहे.
तुम्हाला काय वाटतं का म्हणून ह्या हत्तींनी आपला परिसर सोडून मानवी वस्तीत आले असतील. आणि पुढे ते कुठे जात असतील.
ही बातमी लिहिणारे अतिशय प्रतिभाशाली आणि अभ्यासू युवा लेखक :- "वैभव पाटील."
तुमच्यासाठी त्यांच्या फेजबुक अकाउंटची लिंक देतोय. त्यांचे मित्र व्हा, त्यांना फॉलो करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत