निंभोरा येथील ट्रान्सफॉर्मर आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित
निंभोरा येथील ट्रान्सफॉर्मर आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी वेळीच दाखल घेतल्याने विजेचे संकट टळले
मुक्ताईनगर प्रतिनिधी : - गेल्या दोन आठवड्यापुर्वी चक्रीवादळ व अवकाळी चे थैमान यात शेतकरी हवालदिल झालेला असतांना निंभोरा येथील २५ एमव्हिए चे ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने या ट्रान्सफार्मर अंतर्गत असलेल्या ऐनपुर सब स्टेशन मध्ये येणारी १० ते व परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या अभावी पिकांना पाणी दिले जात नसल्याने शेतकऱ्यांची १२ गावे प्रचंड चिंता वाढली होती. तर गावातील देखील बत्ती गुल झाल्याने अनेक गावे अंधारात होती. परिसरातील शेतकऱ्यांनी व जेष्ठ नागरिकांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली. व सस्येबाबत अवगत केले. आ. चंद्रकांत पाटील यांनी लागलीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी देखील तात्काळ वरिष्ठ पातळीवर निंभोरा येथील २५ एमव्हिए चे ट्रान्सफार्मर दुरुस्ती करून कार्यान्वित करण्यासाठी लागलीच पाठपुरावा केला. यामुळेच युद्धपातळीवर महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम यशस्वीपणे पार पडल्याने ट्रान्सफार्मर कार्यान्वित झालेले आहे.
निंभोरा येथील २५ एमव्हिएच्या ट्रान्सफार्मर अंतर्गत ऐनपूर सबस्टेशन मधील ऐनपूर, निंबोल, विटवा, खिर्डी, धामोडी, भामलवाडी, शिंगाडी, कांडवेल तसेच इतर गावे विजेच्या समस्येपासून मुक्त झालेली असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिसरात आमदार चंद्रकांत पाटील व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या समयसुचकतेचे व दुरुस्तीचे काम तात्काळ केल्याने शेतकरी व गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत