खडसेंना ओबीसी आरक्षणावरून ट्विटरवर अपशब्द अकाउंट धारकाविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा
खडसेंना ओबीसी आरक्षणावरून ट्विटरवर
अपशब्द
अकाउंट धारकाविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा
जळगाव प्रतिनिधी - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या नेत्या अॅड . रोहिणी खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते . या पार्श्वभूमीवर ट्विटर या सोशल साईडवर रोहिणी खडसे यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अपशब्द व आक्षेपार्ह टीका केली . याप्रकरणी नाथ फाउंडेशनने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .
यावरून संबंधित अकाउंटधारकावर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . अॅड . खडसे यांनी २४ जूनरोजी सकाळी ११ वाजता ' भाजपला ओबीसींचा कधीपासून कळवळा आला . ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता , आता गळ काढण्यात काय अर्थ ? ' असे ट्विट केले होते . त्या ट्विटवर सपोर्ट यूथ अॅट नगमा २१६ या अकाउंटवरून माजी मंत्री खडसे व अॅड. खडसे यांच्याविषयी अपशब्द वापरून आक्षेपार्ह टीका केली आहे . त्या व्यक्तीने खडसे कुटुंबीयांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेबद्दल नाथ फाउंडेशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे . या प्रकरणी नाथ फाउंडेशनतर्फे अशोक लाडवंजारी , सुनील माळी , सुहास चौधरी , अमित वाणी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत