मराठा आरक्षण मिळत नसल्यास राज्यभर उग्र आंदोलन- बन्सिदादा डोके
मराठा आरक्षण मिळत नसल्यास राज्यभर उग्र आंदोलन- बन्सिदादा डोके
मराठा आरक्षण बाबत कोकण विभागीय आयुक्त याना भारतीय मराठा महासंघकडूननिवेदन
उरण प्रतिनिधी (सुनिल ठाकूर ):- मराठा आरक्षण बाबत कोकण विभागीय आयुक्तांकडे आज भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रमुख बन्सी दादा डोके
यांच्या वतीने भागीय आयुक्त आप्पासाहेब मिसाळ याना निवेदन देण्यात आले व इशारा देण्यात आला समाजाला आरक्षण मिळत नसल्यास राज्यभर उग्र आंदोलन सुरू केले जाईल असे राज्य प्रमुख बन्सी दादा डोके यांनी दिला.
भारतीय मराठा महासंघ तर्फे कोकण विभागीय आयुक्त यांचीआरक्षणा बाबत चर्चा करण्यात आली आणि यावेळी निवेदन देण्यात आले सी. बी .डी .बेलापूर कोकण भवन येथे आज राष्ट्रीय पातळीसह प्रादेशिक व कोकण विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते प्रसंगी भारतीय मराठा महासंघ राज्य प्रमुख बन्सी दादा डोके साहेब यानी सांगितले मराठ्यांना फक्त ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे माजी न्यायमूर्ती भोसलेसमितीच्या अहवालावरून मंत्री मंडळाचे दोन दिवस अधिवेशन बोलवूनकेलेल्या शिफारशी अमलात आणावे राज्य सरकारने नियोजित मागासवर्गीय आयोगावर लक्ष्मण हाके सारख्या मराठा द्वेश्ठा इसमाची तातडीने हकाल पट्टी करावी व मराठा समाजाच्या प्रतिनिधी नेमावे मराठा समाजाला जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तो पर्यंत बोर्डासह सारथी संस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करावे जेणे करून मराठा तरुण वेगवेगळ्या परीक्षा पात्र ठरतील जो पर्यन्त मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करून निधिची तरतूद करण्यात यावी व त्या द्वारे मराठा समाजातील होणारी कर्ज प्रकरणातील जाचक अटी नियम शिथिल करून सुलभ व्यवस्था करण्यात यावी जो पर्यन्त मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत ओ बी सी प्रवर्गातून मराठा समाजाला सर्व लाभ देण्यात यावेत या बाबत सहानभूती पूर्वक विचार करून केंद्राने तसेच राज्यशासनाने न्याय द्यावा अन्यथा भारतीय मराठा महासंघ राज्य भर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन सुरू करेल असा इशारा भारतीय मराठा महासंघ राज्य प्रमुख बन्सी दादा डोके यांनी दिला.
कोकण विभागीय आयुक्तांकडे भारतीय मराठा महासंघ राज्य प्रमुख बन्सी दादा डोके कोकण प्रदेशाध्यक्ष सदानंदराव भोसले प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पालांडे नवी मुंबई महिला अध्यक्षा सौ आशताई शेकदार पनवेल तालुका प्रमुख प्रथम शेठ पाटील उरण तालुका प्रमुख संतोष शेठ सावंत व अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत