Header Ads

Header ADS

सावद्यात तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार -एकाला अटक


सावद्यात तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार -एकाला अटक
सावदा प्रतिनिधी- लग्नाचे आमिष दाखत शहरातील २१ वर्षीय तरूणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास सावदा पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सावदा येथे राहणारी २१ वर्षीय तरूणीला सकाळी रनिंग करण्याच्या बहाण्याने संशयित आरोपी योगेश नरसिंग पुरभी(वय-२५) रा. रोहिदास नगर सावदा ता.रावेर याने लग्नाचे आमिष दाखवत २९ मार्च २०२१ आणि १० एप्रिल २०२१ रोजी वाघोदा रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या घरात बलात्कार केला. तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी योगेश पुरभी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.