सावद्यात नाथाभाऊ च्या प्रयत्नाने हद्दवाढ व विकास नगराध्यक्षा अनिता येवले.---------२ कोटी ४० लाखाच्या कामांचे भूमिपूजन
सावद्यात नाथाभाऊ च्या प्रयत्नाने हद्दवाढ व विकास नगराध्यक्षा अनिता येवले.
२ कोटी ४० लाखाच्या कामांचे भूमिपूजन
Savdyat.nathabhau.chya.praytnane.haddavad.v.vikas.nagradhyaksha.anita.yevale
सावदा प्रतिनिधी-शहराच्या विस्तारीत भागात दोन कोटी ४० लाख च्या कामांना सुरुवात करण्यात आली असून लवकरात लवकर ही कामे पूर्णत्वास येतील तसेच शहरातील उर्वरित सोमेश्वर नगर इत्यादी भागातील रस्त्यांच्या कामांना सुद्धा लवकरात लवकर येत्या महिनाभरात सुरुवात होईल संबंधित संबंधित कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून मंजुरी आल्यानंतर लवकरच निविदा प्रक्रिया राबवून उर्वरित कामांना सुरुवात केली जाईल
https://www.lewajagat.com/2021/06/Tata.indica.fadichi.Bike.la.Dhadak.Faizpurcha.Tarun.Thar.html
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नाने हद्दवाढ व विकास कामे या परिसरात होत आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिता येवले यांनी गौसिया नगर येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून शहराची वस्तीची वाढ झपाट्याने होत असून काही परिसर हा नगरपालिकेच्या हद्दी बाहेर होता परिणामी त्या भागातील रहिवासी नागरिकांना नियमानुसार नगरपालिका कोणत्याही सुविधा जसे रस्ते व सांडपाणी निचरा नियोजन म्हणून गटारी आदी मूलभूत सुविधा देऊ शकत नव्हते. परंतु दोन वर्षांपूर्वी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील काही शहरांचा हद्दवाढीचा हा प्रश्न हा बऱ्याच वर्षपासून विचाराधीन होता त्याचा योग्य वेळी पाठ पुरावा करून शहराची हद्दवाढ करण्यात आली.
https://www.lewajagat.com/2021/06/Savdyat.Tarunila.Lagnache.Amish.Dakhvat.Atyachar..html
शहराच्या विस्तारीत भागात विकास कामे करावी यासाठी नाथाभाऊ यांच्या प्रयत्नाने जवळपास २ कोटी रुपये निधी सुध्दा उपलब्ध झाला होता. सदरील विकास कामांबाबत नागरपकिकेतर्फे तातडीने सर्व नगरसेवकांच्या मदतीने सदरील नव्याने विस्तार झालेल्या परिसरातील हद्दीत समाविष्ट झालेल्या वस्त्यांमध्ये विविध कामाचे ठराव करण्यात आले व त्याला अनुषंगिक तांत्रिक मंजुरी साठी पाठविण्यात आले होते. त्या परिसरातील कामांना मंजुरी मिळाल्या आहे अश्या कामांना आज शुक्रवारी सावदा मस्कावद रोड लगतच्या खाजा नगर, गौसिया नगर, तसेच ८० फूट रस्त्याच्या पूर्वेकडील सर्व नवीन विस्तारीत वस्तीतील गटारी व नवीन रस्ते मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिता पंकज येवले यांचे हस्ते करण्यात आले. उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी , पदाधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, अभियंता अविनाश गवळी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
सदरील कार्यक्रम प्रसंगी परिसरातील रहिवाश्यांमध्ये आनंदी वातावरण होते. नागरिकांनी स्वतः नगराध्यक्षा अनिता येवले व सदस्याचे फुल गुच्छ देऊन अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत