Header Ads

Header ADS

शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टरला हृदयविकाराचा झटका:औरंगाबाद हळहळले

 

शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टरला हृदयविकाराचा झटका:औरंगाबाद हळहळले

औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद येथे  शस्त्रक्रिया करत असताना एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. हे तरुण डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

      दिग्विजय शिंदे अस या डॉक्टरांचं नाव आहे. ते औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होते. ते दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करत होते. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

डॉ. दिग्विजय शिंदे हे एक फिजिशियन इंटेंसिविस्ट होते, ते मूळचे इटखेडा येथील आहेत. औरंगाबादेतील स्टेशन रोडवरील खाजगी रुग्णालय जीआय वन हॉस्पिटल येथे ते रुग्णाची छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया करत होते. यावेळी त्यांच्यासोबत इतर डॉक्टर देखील उपस्थित होते.

     शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना डॉ. शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हे लक्षात येताच ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आणि त्यांना वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तात्काळ हृदयविकारतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. परंतू सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ. दिग्विजय शिंदे यांचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.