Header Ads

Header ADS

तलवारीने वार जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू


 तलवारीने वार जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू

 रावेर प्रतिनिधी - : आईला अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून बोलणाऱ्याला शिविगाळ करून तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना सोमवार रात्री  साडे दहा वाजता  रावेरला घडली . याप्रकरणी रावेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

    या बाबत सविस्तर  माहिती अशी की , रावेर येथील राजू देवराम चौधरी , वय -५५ (रा . संभाजीनगर , रावेर) ह्यांनी पुष्पाबाई संतोष मराठे यांना अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून पुष्पाबाई मराठे यांचा मुलगा रविंद्र संतोष मराठे (रा . संभाजीनगर रावेर) याला राग आल्याने याने रागाच्या भरात राजू चौधरीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते.तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली . ही घटना सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली . राजू चौधरीचा भाऊ गणेश चौधरीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात संशयित आरोपी संतोष मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी राजू चौधरी ला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी संशयितास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.