फुलगावच्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
फुलगावच्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
वरणगाव प्रतिनिधी : अपघात घडू नये यासाठी नियोजित बायपास करण्यात आला . या ठिकाणी दिशादर्शक फलक व उपाययोजनांचा र अभाव असल्याने उड्डाणपुलाजवळ अपघातांची मालिका सुरू आहे . १३ जूनला रात्री ९ वाजता फुलगाव बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने फुलगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला . यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री १० ते १ चार तास महामार्ग बंद केला होता.फुलगाव येथून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाची एक बाजू नेहमीच बंद केली जाते . दररोज आलटून पालटून एक बाजू बंद केल्याने तसेच दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांचा अंदाज चुकतो . रस्त्यावर पथदिवे नसल्याने अपघात घडतात . असाच प्रकार सोमवारी रात्री घडला . फुलगाव येथील राकेश पांडुरंग चौधरी ( वय २९ ) हा तरूण भुसावळकडून दुचाकीने ( क्रमांक एमएच १९ डीक्यू .६३९ ३ ) घरी येत होता . रात्री ९ वाजेच्या सुमारास मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यास जबर धडक दिली . त्यात राकेशच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल . याप्रकरणी अरविंद नारायण कुरकुरे ( वय ३८ , रा.हनुमाननगर , भुसावळ ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला . तपास एपीआय संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली
हवालदार मनोहर पाटील , अतुल कुमावत करत आहे . दरम्यान , राकेश चौधरी हा घरातील एकुलता एक मुलगा होता . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , आई - वडील आहेत . चार तास महामार्ग बंद : फुलगाव रेल्वे गेटच्या अलिकडे वरणगाव शहराला बायपास करण्यासाठी दीड किमी लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे . तर फुलगाव हे गाव दीपनगर येथे कोळसा पुरवण्यासाठी तयार केलेल्या रेल्वे लाइनमुळे दोन भागात विभागले गेले आहे . ' नहीं' ने उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले . पण , अद्याप गावात जाण्यासाठी सर्व्हिस रोड तयार केला नाही . यामुळे अपघात होतात . सोमवारी रात्रीच्या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुमारे चार तास महामार्ग बंद ठेवला . प्रशासनाने रस्ते तयार करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला . तोपर्यंत वाहतूक बाजूने वळवण्यात आली होती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत