तारापूर:- करोडोंच्या भंगार चोरीसाठी भंगार माफियांकडून बंद कंपनीला आग
तारापूर:- करोडोंच्या भंगार चोरीसाठी भंगार माफियांकडून बंद कंपनीला आग
"मागील तीन महिन्यात तीन वेळा बंद कंपनीत भंगार माफियांनी आग लावाल्याची घटना तर आता पर्यंत करोडो रुपये किंमतीच्या सामानाची चोरी"
पालघर : ( गजानन मोहिते) - दि.३०, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मागील ३० वर्षापासून साबन व शॉपू निर्मितीच्या क्षेत्रात नावाजलेली कंपनी औरा ऑईल, प्लॉट नं. एन - २२, या कंपनीमध्ये जवळपास ६० ते ७० कर्मचारी काम करत होते. परंतु २०१६ मध्ये अचानक कर्मच्याऱ्यांचा पगार देणे व २०१४ पासून पीएफ भरणे आणि इतर देणी देणे बंद केल्याने कंपनी बंद पडली आणि कंपनीचा मालक हरिश शहा हे ही तेव्हापासून अज्ञातवासात गेले, या कंपनीत साबन व शॉपूसाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, मशनरी व पक्का माल पडून होता. काही काळ कामगारांनी हा माल घेण्यासाठी मालक किंवा कोणी तरी येईल या आशेवर कंपनीवर लक्ष ठेवले परंतु कालांतराने त्यांनी ही कंटाळून सर्व सोडून दिले. याचाच फायदा घेत बोईसर व परिसरातील भंगार माफीयांनी या कंपनीतील मशनरी, मोटार, पंप, ईलेक्ट्रीक साहित्य इत्यादी करोडो रुपये किंमतीच्या सामानावर हात साफ केला आहे.
२०१६ पासून बंद पडलेल्या या कंपनीत झाडे झुडपे वाढून जंगल तयार झाल्याने आता भंगार माफीयांकडून ३० नोहेंबर २०२१ ते २७ जानेवारी २०२२ च्या दरम्यान तीन वेळा आग लावल्याचे उघड झाले आहे. दि.२७ रोजी पहाटे २.३० च्या सुमास १० ते १२ इसम घुसून कंपनीतील सामान चोरी करत असताना आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. या बाबत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्रास माहिती दिल्या नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह दिड ते दोन तासाच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.
यापूर्वी ही दि. ३० नोहेंबर २०२१ व दि. १ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीत चोरी करण्यासाठी गॅस कटर व इतर साहित्य घेऊन घुसलेल्या चोर भंगार माफियांनी आग लावल्याची माहिती आजू बाजूच्या कंपनीतील व परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाल दिलेली होती. त्या वेळी सुध्दा अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळविले होते. यात कंपनीतील पॉकिंग मटेरियल, पुठ्ठा व लाकडी फरनिचर इत्यादी साहित्य जाळून राख झाले होते.
या घटने नंतर काही कामगारांनी कंपनीवर लक्ष ठेवले असता काल या कंपनीत पुन्हा चोरी करण्यासाठी काही इसम घुसले असता त्यांना पकडून बोईसर एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बोईसर येथील सद्दाम नावाच्या भंगार माफीयाचे हस्तक असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलीसांनी मात्र अध्याप कोणतीच कारवाई केली नसल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत