Header Ads

Header ADS

तरुणाने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या



 तरुणाने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

लेवाजगत न्यूज जळगाव-वडिलांचे निधन झाल्यानंतर घरात आई सह एकटाच राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आल्यावर खळबळ उडाली. विजय नामदेव खडके (वय ३०, रा.जुने जळगाव) असे मृताचे नाव आहे. तो रेमंड कंपनीत नोकरीस होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच राहत होता. दरवाजावर खिडकीला दोरी बांधून त्याने आत्महत्या केली. मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.