खिरोदा येथे माजी विद्यार्थी संघ कार्यकारणी सहविचार सभेचे आयोजन
खिरोदा येथे माजी विद्यार्थी संघ कार्यकारणी सहविचार सभेचे आयोजन
खिरोदा प्रतिनिधी(संतोष पाटील):- येथील साने गुरुजी विद्या प्रोबोधिनि सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथे
ऑनलाईन पध्दतीने माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे कार्यकारिणी अध्यक्ष श्री. टी.जी. बोरले सर होते. यांनी महाविद्यालयीन विकासाठी माजी विद्यार्थी संघाची मदत महत्त्वाची ठरते. या विकासासाठी सर्व सभासद कार्यकारणी प्रयत्नशील राहील असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी भूकन सर यांनी आपल्या महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा ही फार मोठी असून या साठी माजी विद्यार्थी संघाची मदत मोठी ठरते, तसेच गुणवत्तेचा वारसा सर्वानी पुढे नेला पाहिजे असे मत व्यक्त केले. सर्व सभासदांनी सर्वतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले ,सभेला शंकर राजपूत, स्वाती परदेशी, अतुल सूर्यवंशी, अविनाश निकम, अमोल अढळ तसेच कॉर्डिनेटर श्री विनीत बोडे सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी .डी सूर्यवंशी मॅडम यांनी केले तर आभार डॉ एन एन लांडगे सर यांनी केले. प्रस्तूत कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सभासद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत