चिंचणी बिचवर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघातात 10 ते 12 पर्यटक जखमी
 चिंचणी बिचवर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघातात  10 ते 12 पर्यटक जखमी
पालघर प्रतिनिधी:- डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात 10 ते 12 पर्यटक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिंचणी बीचला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून हजारो पर्यटक ह्या बीच ला भेटी देत असतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बुधवारी मोठी गर्दी होती. संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास उत्तरे कडून दांडेपाडा भागातून एक कार मोठ्या वेगाने येऊन किनाऱ्यावर भेलपुरी, आईस्क्रीम खायला बसलेल्या पर्यटकांना चिरडून माती रुतली. ह्या अपघातानंतर चिडलेल्या शेकडो स्थानिक ग्रामस्थांसह उपस्थित पर्यटकांनी कार ला गराडा घातला.
ह्यावेळी 55 ते 60 वर्षीय वयस्कर व्यक्ती कार चालवीत असल्याचे दिसून आले. अत्यंत संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी त्या कार ला वेढा घातला. मात्र त्याने स्वतःला कारमध्येच लॉक करून घेतल्याने वाणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस वेळीच उपस्थित झाल्याने त्या चालकाची सुटका झाली.
 
  
कोणत्याही टिप्पण्या नाहीत