नवविवाहित तरुणाने घरात केली आत्महत्या
नवविवाहित तरुणाने घरात केली आत्महत्या
वृत्तसंस्था| जळगाव-सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
गिरीश प्रकाश पाटील (वय ३२, रा. शिरसोली) असे मृत तरुणाचे नावआहे. बांभोरी येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या गिरीशचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले आहे. गुरुवारी रात्री त्याने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे लहान भाऊ सतीश याला जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस पाटील शरद पाटील यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत गिरीश याच्या पश्चात आई, वडील, पत्नी रेणुका व लहान भाऊ सतीश असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत