रेल्वे विभागाचा दुजाभाव - पश्चिम रेल्वेत मासिक पास सेवा सुरू, मध्य रेल्वेची नकारघंटा
रेल्वे विभागाचा दुजाभाव - पश्चिम रेल्वेत मासिक पास सेवा सुरू, मध्य रेल्वेची नकारघंटा
लेवाजगत न्यूज भुसावळ -कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत अप-डाऊन करणाऱ्यांना मासिक पास देण्यास मध्य रेल्वेतील भुसावळ विभाग नकारघंटा वाजवतो. दुसरीकडे पश्चिम विभागातून मात्र मासिक पास वितरण सुरू आहे. धरणगाव ते जळगाव असा पास मिळत असल्याने एकाच जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेच्या दोन वेगवेगळ्या नियमांचा अनुभव येत आहे.
विशेष दर्जा रद्द झाल्यावर सर्व जलद गाड्या नियमित पद्धतीने धावत आहेत. दुसरीकडे पॅसेंजर गाड्या बंद करून त्याऐवजी मेमू गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेने या गाड्यांमधून अजूनही मासिक पास धारकांना प्रवासाची परवानगी दिलेली
नाही. कोरोनाचे नियम सांगत आणि वरिष्ठ पातळीवरून सूचना येत नाही तोपर्यंत पास देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
डीआरएम कार्यालयावर नेणार मोर्चा
पश्चिम रेल्वेत अप-डाऊन करणाऱ्यांना पास दिला जातो. मात्र, भुसावळ विभाग नकार देते. यासाठी लवकरच अप - डाऊन करणाऱ्यांना सोबत घेऊन डीआरएम कार्यालयावर मोर्चा नेण्याचे नियोजन आहे. लवकरच मोर्चाची तारीख निश्चित करू. भारतीय रेल्वेत नियम सर्वदूर सारखेच असावे, असे भाजप शहराध्यक्ष तथा झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य परीक्षित बऱ्हाटे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत