Contact Banner

रावेर तालुक्यातील थोरगव्हाण सरपंच सचिन मोरे अपात्र


 रावेर तालुक्यातील थोरगव्हाण सरपंच सचिन मोरे अपात्र 

थोरगव्हाण प्रतिनिधी:-

 सावदा येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील सरपंच सचिन प्रकाश मोरे यांना उपजिल्ह्याधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. या बाबत जळगाव जिल्ह्याधिकारी यांचे कडे सात ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली होती.


      या बाबत अधिक माहिती अशी की, थोरगव्हाण  येथील सरपंच सचिन प्रकाश मोरे,व ग्रामसेवक थोरगव्हाण यांनी माहे नोव्हेंबर २०१९ व माहे डिसेंम्बर २०१९ या सलग ग्रामपंचायतीच्या दोन मासिक सभा न घेतल्याने येथील राजेंद्र चंद्रकांत चौधरी,कविता संदीप चौधरी,सुरेखा रामदास कोलते,उज्वला यशवंत बाउस्कर,सचिन नंदकुमार चौधरी,सुपडू दोधु मोरे,आशा सुपडू मोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य थोरगव्हाण ता. रावेर यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे तक्रार दाखल केली होती,या तक्रारींवर निकाल देताना माहे नोव्हेंबर २०१९ व माहे डिसेंम्बर २०१९ या सलग ग्रामपंचायतीच्या दोन मासिक सभा न घेतल्याने सचिन प्रकाश मोरे यांना ग्रामपंचायत थोरगव्हाण ता.रावेर येथील सरपंच म्हणून चालू राहण्यास महाराष्ट्र ग्रा. प.अधिनियम १९५९ चे कलम ३६ अन्वये अपात्र घोषित करण्यात येत आहे, असे आदेश दि.२४ जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.