प्रेमासाठी पोटच्या मुलाला संपविले- जळगावातील घटनेने खळबळ
प्रेमासाठी पोटच्या मुलाला संपविले- जळगावातील घटनेने खळबळ
जळगाव प्रतिनिधी | पुत्र हा कुपुत्र होऊ शकत असला तरी माता ही कधी कुमाता होऊ शकत नसल्याचे म्हटले जाते. मात्र आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलास गळफास देऊन ठार मारून जळगावातील एका महिलेने या म्हणीला खोटे ठरविले आहे. ती महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकून कोठडीत रवाना केले आहे. तर या घटनेमुळे परिसह हादरला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की , अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईनेच मित्राच्या मदतीने जंगलात गळफास देवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील ( वय -१४ ) रा. सावखेडा शिवार , जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव अ त्यांची आई मंगलाबाई विलास पाटीलजयदेव शिंपी ( वय -३८ ) रा. विखरण ता. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
याबाबत फिर्यादीत नमूद केल्यानुसार विलास नामदेव पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि मुलगा प्रशांत पाटील यांच्यासह जलाराम नगरात वास्तव्याला आहेत. विलास पाटील हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान , त्यांची पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत असल्याने त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवून प्रशांत त्याची आई मंगलबाई आणि प्रमोद हे दोन्हीत्याचा आई मंगलबाई आणि प्रमाद ह दान्हा सोबत घेवून मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर गावानजीकच्या जंगलात घेऊन गेले. त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले.
त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली . पोलीसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी २ संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपीकसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बऱ्हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान , मुलाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयोन १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे . या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , उपनिरीक्षक नयन पाटील , सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे , सतीश हाळणोर , भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने परिश्रम घेतले. या परिसरात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत