Contact Banner

सावद्यात बकऱ्या चोरून नेणाऱ्या कारचा सिनेस्टाइल पाठलाग.. अपघात..

 


सावद्यात बकऱ्या चोरून   

नेणाऱ्या कारचा युवकाने केला सिनेस्टाइल पाठलाग.. अपघात..
 लेवाजगत न्यूज सावदा- येथील आठवडे बाजारात दि २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंपरुड फाट्या पासूनआठवडे बाजारात जेथे चरणाऱ्या बकऱ्या होत्या तेथे कार क्र .एम एच ०२ ऐ वाय ५१२९ फोर व्हीलर कार ही येऊन धडकली, तेथे कार चालकाने  चौफेर नजर  टाकली असता कोणीही नजरेस आले नसल्याने कारचालक त्याचा साथीदाराच्या मदतीने  कार च्या उघड्या फटका जवळ  बकऱ्यासाठी  भक्षणं, खाद्य टाकताच बकऱ्या चारा खाण्यासाठी येताच त्याने बकरीला कारमध्ये ओढले. तेवढ्यात तेथे झाडाखाली बसलेल्या युवक सैय्यद हसन याने पाहताच या युवकाने ताब्यात असलेल्या त्याच्या मोटारसायकल क्र एम .एच १३ सि .ए ७१५५ या गाडी वरून कारचा सिनेस्टाइल पाठलाग केला. यात मोटारसायकल गटारीत पडली . धावत्या मोटारसायकल सोडून गरूडझेप घेत चालत्या गाडीत चालकाला पकडलेत्या प्रसंगी कार चालकाचा कार वरील ताबा सुटताच कार आठवडे  बाजारातील गुरांचे पाणी पिण्याच्या हळा जवळच असलेल्या महाकाय गटारी वरून झेप घेत ती कार झाडावर आदळली गेली. त्या प्रसंगी कार चालक व त्याचा साथीदार घटनास्थळा वरून पसार झाले. या प्रसंगी शहरवासीयांनी घाव घेतली ही घटना वाऱ्यासारखी शहरात  पसरताच तोबा गर्दी झाली त्या प्रसंगी पोलीस कर्मचारी देवेंद्र पाटील, उमेश पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होऊन सदर घटनेतील कार पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.