Contact Banner

राष्ट्रीय मतदार दिना निमित्त आशिष बोरोले यांची चित्रकारीतून जनजागृती

राष्ट्रीय मतदार दिना निमित्त आशिष  बोरोले यांची चित्रकारीतून जनजागृती

प्रतिनिधी सावदा-भारतीय लोकशाहीला बळकट करायचं असेल तर मतदाराने त्याचा मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे. दरम्यान भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी राष्ट्रीय मतदार दिन भारतामध्ये साजरा केला जातो. भारताने आपले संविधान स्वीकारण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २५ जानेवारी १९५० ला भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. याच दिवसाचं औचित्य साधत जनतेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबद्दल जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने २०११ पासून २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day) सुरू केला आहे. यंदा १२ वा मतदार दिन साजरा केला जात आहे.
राष्ट्रीय मतदार दिना निमित्त आशिष ललित बोरोले यांची आपल्या चित्रकारीतून जनजागृति करीत समस्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे अशे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.