सिंगत व्हाया अंजनसोंडे येथील श्रीवल्ली कोचूर च्या पुष्पा बरोबर रफुचक्कर
सिंगत व्हाया अंजनसोंडे येथील श्रीवल्ली कोचूर च्या पुष्पा बरोबर रफुचक्कर
सावदा /प्रतिनिधी सिंगत ता. रावेर:- येथील माहेरवाशीन (वय 23)व अंजानसोंडे ता. भुसावळ येथील सासुरवाशीन एक विवाहित महिला तिच्या कोचुर ता. रावेर येथील प्रियंकारसोबत (वय 22) रफूचक्कर झाल्याने चर्चेला उधाण आले होते.
प्रियकराच्या वडिलांकडून सावदा पोलिस स्टेशनला कोचुर येथील मुलाची हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. तक्रारीनुसार सावदा पोलिसांनी शोध घेतला असता सदर प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन इंदोर येथे रवाना झाल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांचे पथक इंदूर येथे जाऊन प्रियकर व प्रेयसी ला घेऊन आज मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता सावदा पोलिस स्टेशनला हजर झाले. यात अंजनसोंडा येथील विवाहिता व कोचुर येथील प्रियकर यांना फौजदार यांचे समोर हजर केल्यावर आम्ही सोबत पळून गेलो होतो असे कबूल केले दरम्यान या विवाहितेच्या सासर कडच्यानी वरणगाव पोलीस स्टेशनला सोनं व पैसे चोरीची तक्रार दाखल केली होती. वरणगाव पोलीस स्टेशन देखील प्रियकर व प्रेयसी चा शोध घेत होते त्यानुसार सावदा पोलीस स्टेशनं कडून दोघांना पुढील तपासासाठी वरणगाव पोलीस स्टेशनं कडे सोपवन्यात आले.
पाच वर्षापूर्वी झाले होते दोघांचे लग्न
सिंगत येथील श्रीवल्लीच्या ( नाव बदललेले ) अंजनसोडा येथील एकाशी पाच वर्षापूर्वी दोघांचे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे मोठ्या थाटामाटात लग्न झाले असून या संसारवेलीवर दोघांना एक तीन वर्षाचा गोंडस मुलगा आहे परंतु मुलाचा कोणताही विचार न करता विवाहिता प्रियकरासोबत पळून गेल्याने वरणगाव व सावदा परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. तिघांच्या परिवारातील ज्येष्ठांनी या अनैतिक प्रेमप्रकरणाला शिव्यांची लाखोली वाहिली होती. सिंगत व्हाया अंजनसोंडा येथील श्रीवल्ली ( नाव बदललेले )कोचुर येथील पुष्पा( नाव बदललेले ) बरोबर पळून गेल्याने या लव्हस्टोरीची दिवसभर जोरदार लहान थोर महिला बालक यांच्या तोंडावर चर्चा होती.
 
   
  
कोणत्याही टिप्पण्या नाहीत