स्वातंत्र्यसैनिक श्रीधर पाटील अनंतात विलिन स्मृतीस अभिवादन ...
स्वातंत्र्यसैनिक श्रीधर पाटील अनंतात विलिन स्मृतीस अभिवादन ...
शुन्यामधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी
स्वातंत्र्यसैनिक श्रीधर पाटील या जगात आज नाही, यावर कोणालाच विश्वास बसत नाही. श्रीधर पाटील यांचे अचानक जाणे सर्वांच्या मनाला चटका लावणारे ठरले आहे. आज दि. ३० जानेवारी ला ते या जगातून अचानकपणे निघून गेले. याची हंबर्डी सह परिसरात सर्वांनाच हळहळ वाटत आहे.
हबर्डी येथिल स्वातंत्र्यसैनिक श्रीधर पाटील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तथा एक प्रभावी नेतृत्व धडाडीचे व्यक्तिमत्व असलेले स्वातंत्र्यसैनिक श्रीधर भगवान पाटील हे ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता दुःखत निधन झाले ते ९४ वर्षाचे होते.
स्वर्गीय धनाजी नाना चौधरी, स्वर्गीय मधुकरराव चौधरी, स्वर्गीय गोवर्धनदास गुजराथी चोपडा, निवृत्ती कीरंगे हंबर्डी, यांच्यापासून त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात येण्याची प्रेरणा मिळाली होती श्रीधर पाटील यांनी पंधरा वर्षे वयातच खेळण्या-बागडण्याच्या दिवस असतानाच १९४२ भारत छोडो आंदोलनात भाग घेतला त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांच्यातील देशप्रेम व त्यागाची भावना यावरून स्पष्ट होते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी पुढाकार घेऊन हंबर्डी गावच्या नागरिकांना एकत्रित करून झेंडावंदनाचा कार्यक्रम करण्यात आला हंबर्डी गावात कापसाची जिनिंग प्रेस ही त्यांनी चालवली जागृती विद्यालय हंबर्डी आणि वि.का. स.सो. चे चेअरमन पदही त्यांनी अनेक वर्षे भूषवले एक कुशल संघटक म्हणून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू बघायला मिळले अविरत चिंतन आपल्या परिसरकता नविन्याचा विकासाचा ध्यास हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य त्याच्यात दिसून आले होते
श्रीधर पाटील एक मोठ व्यक्तिमत्त्व अनंतात विलिन झालं. त्यांच्या स्मृतीस अभिवादन ...
पाटील परिवारावर कोसळलेल्या या दु:खातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि स्वातंत्र्यसैनिक श्रीधर पाटील यांच्या मृतात्म्यास सद्गती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !
(शोकाकूल)
- खेमचंद गणेश पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत