घंटो का काम मिनिटोमे" पिलखेडा ते करंज 10 किलोमीटरचे अंतर फक्त 3 किलोमीटर होणार
"घंटो का काम मिनिटोमे" पिलखेडा ते करंज 10 किलोमीटरचे अंतर फक्त 3 किलोमीटर होणार
लेवाजगत न्युज- पिलखेडा ते करंज शेतरस्त्यावर दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे 500 एकर शेतजमिनी आहेत. परंतु रस्त्याने अंतर सुमारे 10 किलोमीटर होते. ग्रामस्थांना मोठा फेरा पडतो.
या रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्याकडे केली असता. मंत्रीमहोदयांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी या शेतरस्त्याचे दर्जा उन्नतीकरण करून घेतले आणि या रस्त्यासाठी सुमारे 50 लाखांचा निधी मंजूर करून काम सुरू झाले आहे.
यामुळे पिलखेडा ते करंज हे अंतर 10 किलोमीटरवरून तब्बल 3 किलोमीटर इतके कमी होणार असून चोपडा येण्याजाण्यासाठी 7 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके वाहून नेणे व शेतमालाची वाहतूक करणे अत्यंत सोयीस्कर होणार असून दोन्ही गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत व लवकरच भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
पिलखेडा ते करंज शेतरस्ता मजबुतीकरण कामाची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, राजेंद्र आनंदा चौधरी, राजेंद्र काशीनाथ चौधरी, गुरुनाथ भास्कर चौधरी हे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत