अंगठी सुंदर असल्याचे सांगून दोन भामट्यांनी केली संपास
अंगठी सुंदर असल्याचे सांगून दोन भामट्यांनी केली संपास
लेवाजगत न्यूज जळगाव-तुमच्या बोटातील अंगठी खूपच सुंदर आहे, मला पण अशीच बनवायची आहे' अशी बतावणी करून दोन भामट्याने वृद्धाच्या बोटातून २४ हजार रुपयांची अंगठी काढून घेत पोबारा केला. ही घटना गणेशवाडी परिसरात ३१ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजता घडली.
अरुण गिरधर धांडे (वय ७४, रा. रणछोडनगर) यांच्या सोबत हा प्रकार घटनास्थळाजवळील एका घराबाहेरील घडला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला भामटा. कॅमेरात चित्रित झाली आहे. धांडे हे पायी चालत असताना हा भामटा दुचाकीने त्यांच्याजवळ आला. लिफ्ट देण्याचा बहाणा करून धांडेंना दुचाकीवर बसवून काही अंतर पुढे गेला. त्यानंतर तुमच्या बोटातील अंगठी खूपच सुंदर आहे मला पण अशीच बनवायची आहे असे सांगून त्यांच्या बोटातील अंगठी बघण्याच्या उद्देशाने काढून घेतली. अंगठी परत न करता भामट्याने पोबारा केला. धांडे हे ७४ वर्षांचे वृद्ध असल्यामुळे त्याचा पाठलाग किंवा अरोडाओरड करू शकले नाही.
दरम्यान, घटनेच्या चार दिवसांनंतर धांडेंनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एका घराबाहेरील सीसीटीव्ही तपासले असता भामट्याच्या दुचाकीवर धांडे हेबसलेले असल्याचे दिसून आले आहे. या फुटेजच्या आधारे भामट्याचा शोध सुरू आहे. त्याने यापूर्वीदेखील चारवेळा अशाच पद्धतीने चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. किशोर पाटील तपास करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत